धुळे: मौलवी गंज जमियत उलेमा कार्यालय ठरले मदतीचे केंद्र; जमियत उलेमाच्या पुढाकारातून पंजाब पूरग्रस्तांना लाखोंचा मदत
Dhule, Dhule | Sep 16, 2025 पंजाबमधील भीषण पुरग्रस्तांसाठी धुळ्याच्या जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेने मदतनिधी उभारणी केली. मशिदींमधून केलेल्या आवाहनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून लाखोंचा निधी गोळा झाला. यात सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले, जेव्हा न्याळोदचे शेतकरी गणेश माळी यांनीही पाच हजारांची मदत दिली. जमा झालेला निधी पंजाबला पाठवण्यात आला असून, या उपक्रमाने जात-धर्मापलीकडे मानवतेचा संदेश दिला.