धामणगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग १६ वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धामणगांव रेल्वे येथे सलग १६ वर्षांपासून अखंडपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, हा उपक्रम परिसरातील सर्वात मोठा, विश्वसनीय आणि प्रभावी समाजसेवेचा उपक्रम ठरला आहे. समाजासाठी काहीतरी उपयुक्त घडावे या हेतूने राबविण्यात येते यावेळी अनेकांनी रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.