विक्रमगड: स्विमिंग पूलमध्ये बुडून साडेतीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू; विरार येथील घटना
विरार येथील यशवंतनगर परिसरात अमेय क्लासिक क्लब आहे. या क्लबमध्ये आईसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहोण्यासाठी साडेतीन वर्षाचा मुलगा गेला होता. पोहत असताना तो अचानक पाण्यात बुडाला. गार्डने त्याला तात्काळ बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. ध्रुव बिष्ट या घटनेतील मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.