कुरखेडा: भाजपा जिल्हा अल्पसंख्यक आघाडीचा वतीने कूरखेडा मुस्लिम कब्रस्तानात स्वच्छता अभियान
भाजपा जिल्हा अल्पसंख्यक आघाडीचा वतीने सेवा पंधरवाडा निमित्त आज दि.१७ सप्टेबंर बूधवार रोजी दूपारी ३ ते ४ वाजे दरम्यान शहरातील मुस्लिम कब्रस्तानात श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी कब्रस्तानातील मूख्य रस्त्यांची साफ सफाई करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आज दि.१७ सप्टेबंर वाढदिवस ते २ आक्टोबंर राष्ट्रपीता महात्मा गांधी जयंती हा पंधरवाडा भाजपा पक्षाचा वतीने विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे या अंतर्गत येथे आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले.