शेगाव: माटरगाव शिवार येथे शेतमजूर महिलेचा विनयभंग;आरोपी विरूध्द गुन्हा दाखल
शेगाव तालुक्यातील माटरगाव शिवार येथील एका शेतात मजुरीसाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध जलंब पोलिस ठाण्यात ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान गुन्हा दाखल केला आहे.३२ वर्षीय महिलेने जलंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीनुसार ती शेतात मजुरीसाठी गेली असता माटरगाव येथील 55 वर्षीय इसमाने विनयभंग केला. याप्रकरणी जलंब पोलिसांनी तक्रारीवरून एका इसमा विरोधात कलम 74 भा न्या संहीता गुन्हा दाखल .