नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना देशातील १२० कोटी नागरिकांचे आशीर्वाद आहेत. ते एक 'विकास पुरूष', एक अथक आणि कष्टाळू पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे.