कोपरगाव: सोनेवाडीत रस्त्याचा केक कापून केला वाढदिवस साजरा #jansamasya
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे नगदवाडी परिसरात सोनेवाडी डोऱ्हाळे रोडवर गुरसळ वस्ती नजिक असलेला खड्डा गेल्या दहा वर्षापासून तग धरून राहिला वेळोवेळी विविध प्रशासनाकडे हा खड्डा बुजवण्याची मागणी केली मात्र याची दखल कोणीच घेतली नाही. अनेक जण या खड्ड्यात पडले मग मात्र ग्रामस्थांनी एकत्र येत आज १७ सप्टेंबर रोजी खड्ड्याचा केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी बाळासाहेब जावळे, धनंजय माळी, बाबासाहेब गुरसळ, विठ्ठल गुरसळ, सुरेश साबळे, अण्णासाहेब साबळे, रमेश साबळे, भीमराज जायपत्रे उपस्थित होते