रामटेक: नगरपरिषद रामटेक निवडणुकीत एकूण 65.36% मतदान, उमेदवाराचे भवितव्य मत मशीन मध्ये बंद
Ramtek, Nagpur | Dec 2, 2025 न प रामटेकची सार्वत्रिक निवडणूकेचे मतदान मंगळवार दि. 2 डिसेंबरला सायं. 5.30 वाजता पर्यंत घेण्यात आले. परंतु काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने अधिकच्या वेळात सर्व मतदारांचे मतदान करून घेण्यात आले. शेवटी एकूण मतदान 65.36% झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिली. रामटेक शहरातील 28 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात एकूण 20,508 मतदारांपैकी 13,404 मतदारांनी मतदान केले.