अमरावती: खेळणी बँक नामक उपक्रम ठरला मतिमंद मुलांकरिता अभिनव उपक्रम, भारतीय जैन संघटनेचे वतीने भव्य आयोजन
सामाजिक व राजकीय क्षेत्रासोबतच अनेक लोक कल्याणकारी उपक्रम भारतीय जैन संघटना महिला आघाडीच्या वतीने राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात 14 नोव्हेंबर हा दिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो. या बालक दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने राजापेठ येथील स्व. दौलतभाई देसाई मतिमंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांना वस्तूंचे वितरण केले. मतिमंद विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हास्य फुलवण्यासाठी भारतीय जैन संघटना महिला आघाडीने हा अनोखा उपक्रम राबविला आहे