हिंगणघाट: नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु:आज रात्री १० वाजता थंडावरणार प्रचारतोफा
हिंगणघाट २ डिसेंबरला होऊ घातलेल्या शहरातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला असून विविध राजकीय पक्ष उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराला कामाला जोमाने लागले आहे.राज सोमवारी रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावरणार आहे. यामुळे सकाळी आज उमेदवार व कार्यकर्ते प्रचारकामी लागले आहे.सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी व उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन आपला अजेंडा शहरातील नागरीकांसमोर मांडत आहे.आता येणाऱ्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे