सडक अर्जुनी: बोंडगांवदेवी येथे हमीभाव धान खरेदी केंद्राचा शुभारंभ
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गोंदिया चे वतीने सब एजंट संस्था म्हणुन दि. शेतकी खरेदी विक्री समीती अर्जुनी-मोर. ही तालुक्यात सात, आठ केंद्राचे माध्यमातुन शासकिय आधारभुत हमी भाव धान खरेदी केंद्र चालवीते. दि.28 नोव्हेंबरला तालुक्यातील बोंडगांवदेवी येथे हमी भाव धान खरेदी केंद्राचा शुभारंभ काटा पुजन करुन खरेदी विक्रीचे संचालक तथा बोंडगावदेवी वि.कार्य. सेवा. सह.संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर बोरकर यांचे हस्ते करण्यात आला.