पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची अजित पवार स्वतः मुलाखत घेत आहेत. ज्या उमेदवारांकडे जनतेत प्रभाव आहे आणि निवडून येण्याची वास्तव शक्यता आहे, अशा उमेदवारांनाच तिकीट देण्याचा निर्णय पक्षस्तरावर घेण्यात येत आहे.