कोरेगाव: सातारा जिल्ह्यात राजकीय भूकंप; सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का, अजितदादा गटात प्रवेशाची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष सुनील माने यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. रविवारी ९ नोव्हेंबर रोजी ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादा गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. रहिमतपूर येथे शुक्रवारी दुपारी चार वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत माने यांनी निर्णयाची घोषणा केली. त्यांच्यासमवेत कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर उपस्थित होते.