रामटेक: मासोळी, खेकडे पकडायला गेलेल्या इसमाचा काचुरवाही - खंडाळा दरम्यान असलेल्या सुर नदीच्या पाण्यात पडून मृत्यु
Ramtek, Nagpur | Oct 29, 2025 रामटेक शहरातील विवेकानंद वार्ड येथील रहिवासी तथा मासेमारी करणाऱ्या एका अंदाजे 52 वर्षीय इसमाचा तालुक्यातील काचूरवाही - खंडाळा दरम्यान असलेल्या सूर नदीच्या पाण्यात मासोळ्या खेकडे पकडताना पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. 29 ऑक्टोबरला दु. 12 वा.च्या दरम्यान लक्षात आली. मृतकाचे नाव धनराज तुळसीदास मोहनकार असे असून तो पाण्यात पालथा अवस्थेत पडलेल्या अवस्थेत आढळला. माहितीप्रमाणे धनराज हा मंगळवार दि. 28 ऑक्टोबरला स. 10 वाजता पासून नेहमीप्रमाणे मासोळी खेकडे पकडावयास घरुन निघाला होत.