रेणापूर: पोलीस ठाणे हद्दीतीलअवैध हातभट्टीविरोधात मोठी कारवाई – 96 हजारांचा मुद्देमाल जप्त, 4 गुन्हे दाखल
Renapur, Latur | Nov 23, 2025 लातूरमध्ये अवैध हातभट्टीविरोधात मोठी कारवाई – 96 हजारांचा मुद्देमाल जप्त, 4 गुन्हे दाखल लातूर जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत रेणापूर परिसरात मोठी छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान हातभट्टी दारू तयार करणाऱ्या चार जणांविरोधात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.