फुलंब्री: फुलंब्री शहरातील हरिओम नगर भागात अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यासह दोन लाख 17 हजाराचा ऐवजी लांबविला
फुलंब्री शहरातील हरी ओम नगर भागामध्ये अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यास 2 लाख 17 हजाराचा ऐवज लांबविल्या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील छेडछाड केले आहे. त्यामुळे आता पोलिस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे.