शहरात काल दि 4 डिसेंबर ला रात्री 11 वाजता च्या पठाणपुरा परिसरातील मसीहा लॉनमध्ये एक अस्वल फिरताना दिसल्याने परिसरात दहशत पसरली असून गावकरी आणि स्थानिक रहिवासी भयभीत झाली आहे. यामुळे मुले आणि महिला घरातच अडकून पडल्या. रहिवाशांनी वन विभागाला या वन्य प्राण्याला पकडून सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे.