चंद्रपूर: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच लाखाची दारू जप्त, उदापूर येथील घटना, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
चंद्रपूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार दिनांक 01 ते 03 डिसेंबर 2025 या कालावधीत दारूबंदी लागू असताना उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे गणेश पाटील व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.