हवेली: सराईत आरोपींचा थरारक युनिट-२ ची मोठी कामगिरी दोन पिस्तुल, ७ जिवंत काडतुसे, घातक हत्यार जप्त.
Haveli, Pune | Nov 28, 2025 चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर मोटारीमधील गुन्हेगाराने गोळी झाडण्याचा प्रयत्न करताच पोलीस हवालदाराने प्रसंगावधान राखत गुन्हेगाराच्या हातातील पिस्तुल हिसकावले.यावेळी झालेल्या झटापटीत पिस्तुलातून सुटलेली गोळी मोटारीच्या टपाला लागून आरपार गेली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.