रामटेक: जय श्रीराम च्या गजरात गड मंदिर रामटेक येथील श्रीराम व लक्ष्मण मंदिराच्या शिखरावर जाळला त्रिपुर
Ramtek, Nagpur | Nov 6, 2025 त्रिपुर पौर्णिमेच्या पावन पर्वावर बुधवार दिनांक 5 नोव्हेंबरला रात्री बारा वाजता ठोक्याला गड मंदिर रामटेक येथील श्रीराम व लक्ष्मण मंदिराच्या शिखरावर मंदिरांचे पुजारी यांच्या हस्ते पारंपारिक त्रिपुर दहन करण्यात आले. यावेळी जय श्रीराम चा जय घोष करण्यात आला. तर फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली. उपस्थित रामभक्तांना प्रसाद, मिठाई, बुंदी वितरित करण्यात आली, टाळ, मृदंगाच्या निनादात भजन गायले गेले.