कारंजा: न.प निवडणूक BREAKING!🗳️
मतदारांच्या बोटावर लागणार मार्कर पेनची शाई. मतदान प्रक्रिया अधिक कडक.पारंपरिक शाईला ब्रेक.
Karanja, Washim | Nov 28, 2025 आज २८ नॉव्हेंबर २०२५ शुक्रवार रोजी प्राप्त माहीती नुसार कारंजा येथे येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत बोटावर मतदारांच्या लावण्यात येणारी पारंपरिक शाई यंदा वापरली जाणार नाही. तर त्या जागी प्रथमच विशिष्ट प्रकारच्या मार्क पेनची गडद आणि टिकाऊ शाई वापरण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये हा पहिलाच प्रयोग असल्याने मतदारांमध्ये याची चर्चा रंगत आहे..