रिसोड: सिव्हिल लाईन येथील मोबाईल दुकानात चोरी साडेतीन लाख रुपयांचे मोबाईल लंपास रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Sep 17, 2025 रिसोड शहरातील सिव्हिल लाईन येथील मोबाईल दुकानातून साडेतीन लाख रुपये किमतीचे 30 मोबाईल चोरी झाल्याची घटना दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी अमोल चंद्रकांत उखळकर यांच्या फिर्यादीनुसार रिसोड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दिली आहे