फलटण: फलटणच्या भर चौकात ‘सत्यसाक्ष’; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा भावनिक स्फोट, फलटणकरांचा दुग्धाभिषेकाने समर्थन
फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या राजकीय वादळाला अखेर माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास खुल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. “माझी नारको एनालिसिस टेस्ट करा, मी तयार आहे,” अशा ठाम शब्दांत त्यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं. भर चौकात राज ठाकरे यांच्या शैलीत “लाव रे तो व्हिडिओ” म्हणत सर्व व्हिडिओ दाखवून त्यांनी नागरिकांसमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडली. फलटणकर नागरिकांनी निंबाळकर यांच्यावर विश्वास दर्शविला.