महाड: माणगाव तालुक्यातील साई ग्रामपंचायत येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
Mahad, Raigad | Sep 16, 2025 आज मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास ग्रामपंचायत साई, ता. माणगाव येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत गावातील अनेक स्थानिक ग्रामस्थांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठा यासारख्या मुलभूत समस्या मांडल्या. नागरिकांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे आपले अनुभव, अडचणी आणि अपेक्षा मांडल्या. ग्रामस्थांचे प्रश्न ऐकत असताना, हे लक्षात आले की काही समस्या अतिशय तातडीच्या स्वरूपाच्या आहेत.