अमरावती: बोगस डॉक्टरांवर पोलिसांच्या समन्वयाने कारवाई करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
*बोगस डॉक्टरांवर पोलिसांच्या समन्वयाने कारवाई करावी* *-जिल्हाधिकारी आशिष येरेकर* अमरावती, दि. 11 (जिमाका): बोगस डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. याबाबत सखोल तपासासाठी आरोग्य यंत्रणांकडे आलेल्या तक्रारी पोलिसांनाही देण्यात याव्यात. यामुळे भविष्यातही कारवाई करता येईल, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.