कामठी: बावनकुळे यांना आला सत्तेचा माज, माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी दिले थेट आव्हान
Kamptee, Nagpur | Nov 27, 2025 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून कामठीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आवाहन दिले आहे. दरम्यान बावनकुळे यांना सत्तेचा माज आला असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा कामठीतील राजकीय वातावरण तापले आहे.