निफाड: पिंपळगाव (नजीक) जवळ पुलावरील निष्काळजी कामामुळे तरुणाचा मृत्यू; ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच
Niphad, Nashik | Nov 15, 2025 लासलगाव–पाटोदा रोडवरील पिंपळगाव (नजीक)जवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामातील निष्काळजीपणामुळे ध्रुव लक्ष्मण खुळे(55) याचा जीव गेला आहे. पायी प्रवाशांसाठी कोणतीही सुरक्षा सुविधा उपलब्ध नसताना पुलाचे काम संथ गतीने चालू आहे. याच निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे. मृत युवकाचा भाऊ याने संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत असून स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे.