राहता तालुक्यातील साकोरी येथे डुकरांमध्ये आफ्रिकान स्वाईन फ्लू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पशु वैद्यकीय पथक साकोरी गावात दाखल झाले असून डुकरांची शासकीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. साकोरी गावात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा पशु वैद्यकीय पथकाने काही नमुने मध्यप्रदेश येथील भोपाळ या ठिकाणी चाचणी साठी पाठवले होते.