हवेली: पिंपरीमध्ये बाईकस्वाराचा भीषण अपघात; BRT स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकले डोके
Haveli, Pune | Nov 8, 2025 पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात बीआरटी लेनमध्ये एका बाईकस्वाराचा अत्यंत भीषण आणि विचित्र अपघात झाला आहे.भरधाव वेगात जात असताना बाईकवरील नियंत्रण सुटल्याने बाईक थेट बीआरटी बस स्टँडच्या लोखंडी ग्रीलवर आदळली, आणि तरुणाचे डोके त्या ग्रीलमध्ये अडकले. या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.