रामटेक: रामटेक - तुमसर मार्गावर बोरी शिवारात एक कार ट्रक वर आदळली ; कार चालक जबर जखमी
Ramtek, Nagpur | Nov 4, 2025 रामटेक - तुमसर मार्गावरील बोरी शिवारात एक कार समोरून येणाऱ्या एका कारवर आदळल्याने ट्रकचालकाचे ट्रक वरून नियंत्रण सुटले व ट्रक उलटला. तर कारच्या समोरच्या भागाचा पार चंदामेंदा झाला. यात कारचालकाच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्याला रामटेक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ आणले असता प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. ही घटना सोमवार दिनांक 3 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान बोरी शिवारात घडली.