हवेली: थेरगाव येथे विवाहित प्रेयसीचा खुन प्रकरणात वाकड परिसरातुन प्रियकराला अटक
Haveli, Pune | Dec 1, 2025 सतत विवाहाचा आग्रह धरण्यामुळे विवाहित प्रेयसीचा खुनाची घटना घडली. मृत विवाहितेचे नाव राणी विशाल गायकवाड (२६, रा. वाकड) असून आरोपी अनिकेत महादेव कांबळे (३३, रा. थेरगाव) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. २६ नोव्हेंबर रोजी राणी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली. तांत्रिक तपासात तिचा सतत अनिकेतशी संपर्क असल्याचे उघड झाले. पुढील तपासानंतर अनिकेतची चौकशी करण्यात आली आणि तांत्रिक पुरावे समोर ठेवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.