मागील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांना घेवून चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्थेतर्फे आज दि.६ डिसेंबरला ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. चंद्रपूर रेल्वे प्रवाशांना गेल्या अनेक वर्षापासून देशाच्या व इतर विविध ठिकाणी जाणे येणे करण्यास रेल्वेतून प्रवास करतांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.