कोपरगाव: शहरातील खड्ड्यात कागदी होड्या सोडत कोल्हे गटाचे लक्षवेधी आंदोलन
कोपरगाव शहरातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. कोपरगाव शहरातील कोल्हे समर्थक तरुणांनी खड्ड्यात कागदी होड्या सोडत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.आज १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हे अनोखे आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.