गोंदिया: ऐन निवडणुकी तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रकाश बघेले यांनी दिला तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा
Gondiya, Gondia | Nov 26, 2025 नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश बघेले यांनी खासगी कामाचे कारण समोर करून जिल्हाध्यक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगरपंचायत निवडणूक लढण्यासाठी उमेदवार म्हणून एकाही व्यक्तीचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले नाही.त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.पक्षातील पदाधिकाऱ्यांसह मतदार तालुकाध्यक्ष प्रकाश बघेले यांना जाब विचारून प्रश्नाचा भडीमार करीत असल्याची चर्चा आहे.