काटोल: नीलगायीची शिकार करून 'वाघ' रस्त्यावर! शेतकऱ्याने धास्ती घेऊन काढला पळ; वन विभागाला माहिती
Katol, Nagpur | Nov 27, 2025 रिधोरा, मौजा बोरखेडी परिसरात नीलगाय या वन्य प्राण्याची शिकार करून 'वाघ' रस्त्यावर बसलेला दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी जानराव उमाळे हे त्यांच्या सायकलने जात असताना त्यांना रस्त्यावर नीलगायीची शिकार करून वाघ बसलेला दिसला. हा थरार पाहताच त्यांनी घाबरून तत्काळ मागे फिरून गावाकडे पळ काढला आणि गावकऱ्यांना ही माहिती दिली. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरली.