चंद्रपूर: आ. किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर, पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते उद्घाटन
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आज दि 17 सप्टेंबर ला 2 वाजता आदिवासी विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.