पालघर: राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळे नजीक टेम्पोचा अपघात; चालक जखमी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोचा अपघात घडला आहे. राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोच्या लाखाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो समोरील अज्ञात वाहनाला धडकला. या अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकेतून मुंबई येथे हलविण्यात आले. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही टेम्पोचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.