बल्लारशाह – गोंदिया रेल्वे रुळावर तसेच भद्रावती व वरोरा परिसरात एका दिवसात तीन वन्यजीवांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ४१३ मध्ये चंद्रपूरकडे येणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच्या धडकेत एका मादी सांबराचा मृत्यू झाला. तर भद्रावती हायवेवर पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळाचा आणि वरोरा येथे आनंदवन चौकाजवळ हायवेवर साळिंदराचा मृत्यू झाला. बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्ग हा वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत असून आजवर या रुळावर १६ वन्यजीवांचा दुर्दैवी मृत्यू झा