सेलू: घोराडमध्ये खुलेआम चालतो लाखो रुपयांचा बावनपत्यांचा जुगार; पोलिसांचे अर्थपूर्ण मौन!
Seloo, Wardha | Nov 30, 2025 तालुक्यातील घोराड गावात कायद्याला धाब्यावर बसवून खुलेआम लाखो रुपयांचा बावनपत्यांचा (५२ पत्त्यांचा) जुगार सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गावाच्या मध्यभागीच, बोर नदीकाठच्या गोठाणावर भरदिवसा हा जुगार सुरू असून पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घोराडमध्ये दिवसाढवळ्या चालणारा लाखो रुपयांचा हा जुगार तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी ता. ३० ला दुपारी ३ वाजता नागरिकांकडून करण्यात आली.