दिंडोरी: दिंडोरी तालुक्यातील जलसंधारणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावा मंत्री झिरवाळ यांचे नाशिक येथ जिल्हाधिकारी कार्यालयात निर्देश
Dindori, Nashik | Nov 25, 2025 दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील जलसंधारणाचे प्रश्न संबंधित विभागांच्या समन्वयाने तातडीने मार्गी लावावेत, अशा सूचना अन्न औषध प्रशासन व विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी मंत्री श्री. झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोरी व पेठ परिसरातील रोजगार हमी योजनेमधील वनहरकतीमधील बंधारे वगळणे, गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार, लघुपाटबंधारे योजना देहरेच्या भूसंपादनाबाबतची सद्य:स्थिती, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आदी विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती.