सेलू: विकास चौकातून हातगाडी अज्ञात चोरट्याने पळविली; पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Nov 27, 2025 सेलू शहरातील विकास चौकातून चहा व शिंगाड्यांची चार चाकी हातगाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सौ. शोभा वसंत भांदकर (वय ४५, रा. बेलगाव) यांनी सेलू पोलिस ठाण्यात ता. २७ गुरुवारला सायंकाळी ५.३० वाजता तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.