सातारा: मौजे लिंब ग्रामस्थांचे सातारा पंचायत समिती समोर उपोषण सुरू — ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
Satara, Satara | Nov 10, 2025 मौजे लिंब (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आजपासून पंचायत समिती सातारा येथे उपोषणास सुरुवात केली आहे. माहितीच्या अधिकाराखाली मागवलेली माहिती ग्रामसेवकांकडून न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रोशित झाले असून, त्यांनी न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, लिंब ग्रामपंचायतीत अनेक विकासकामांची बिले काढण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात ती कामे झालेली नाहीत. कामे न करता पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप केला.