परळी: राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत नागरिकांना केले संबोधित
Parli, Beed | Nov 24, 2025 परळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत मंत्री पंकजा मुंडे यांनी मतदारांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण विधान केले. परळीच्या विकासाची गती आपसातील संघर्ष आणि राजकीय भांडणांमुळे अनेक वर्षे थांबली होती. मात्र, आता परळीमध्ये दोन प्रमुख नेते मिळून काम करणार असल्याने विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आता परळीत आम्ही दोघे मिळून लक्ष घालून काम करणार आहोत. एकमेकांना धाक लावून, परळीसाठी एकत्र येऊन काम करणार आहोत.