आर्वी: मनरेगा अंतर्गत शासकीय निधीचा मोठा अपहार.. पोलिसांनी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांना केली अटक तीन दिवसाचा पीसीआर
Arvi, Wardha | Nov 28, 2025 पंचायत समिती येथे मनरेगा अंतर्गत शासकीय निधीचा अपहार केल्याचे प्रकरणात सहाय्यक कार्यक्रमाधिकारी यांना तीन दिवसाचा पीसीआर देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली आहे मनरेगा मध्ये घोळ झाल्याच्या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात आली या चौकशीत मोठ्या प्रमाणात हा घोळ बाहेर आला यात प्रणाली कसर यांना अटक करून तीन दिवसीय पोलीस कोठडी देण्यात आली आहे या गुन्हाच्या अनुषंगाने अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे