मावळ: मंगरूळमध्ये भरधाव डंपरने तरुणाला चिरडले, जागीच मृत्यू
Mawal, Pune | Nov 6, 2025 भरधाव डंपरने धडक दिल्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मंगळवारी (दि.४) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.जितेश राजू सैनी (वय ३०, रा.मावळ.मूळ रा. राजस्थान) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय सतीश मडकर (वय २७, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.