राहुरी शहरामध्ये भाजपाच्या प्रचारासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ठान मांडून आहेत. ते आमच्यावर टीका करतात मात्र जे इथे प्रचाराला आले त्यांच्याच गावामध्ये पाच-पाच दिवसांतून एकदाच पिण्याचे पाणी येते. असं म्हणत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर पलटवार केला आहे.आज बुधवारी सायंकाळी राहुरी शहरातील लक्ष्मी नगर परिसरामध्ये प्रचार सभेदरम्यान बोलताना तनपुरेंनी ना.विखेंवर पलटवार केला आहे.