गडचिरोली: 'त्या' दोन माओवाद्यांची ओळख पटली तब्बल 14 लाखांचे होते बक्षीस...पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची पत्रकार परिषदेतून माहिती
मृतक माओवाद्यांवर चकमक, जाळपोळ व खुन इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सदर घटनास्थळावरुन 01 एके-47 रायफल, 01 अत्याधुनिक पिस्तूल असे एकूण 02 अग्निशस्त्र, जिवंत काडतूस, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.