कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 31 प्रभागांसाठी 122 जागांची आरक्षण सोडत जाहीर
Kalyan, Thane | Nov 11, 2025 आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रभागातील जागांची आरक्षण सोडत जाहीर होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीमध्ये आज 31 प्रभागांसाठी 122 जागांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान हरकती नोंदवण्यात येणार आहेत अशी माहिती केडीएमसी मनपा आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली