कोरेगाव: मेगा इंजिनिअरिंग कंपनीची मनमानी; कोरेगावकरांचा जीव मुठीत, प्रशासन गप्प, आमदार शशिकांत शिंदे यांचा संताप
कोरेगाव शहरातील रस्त्यांचा बोजवारा, वाहतूक कोंडी, आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार या सर्वांच्या मुळाशी मेगा इंजिनिअरिंग कंपनीची बेपर्वा कामगिरी आणि राजकीय पाठबळ असल्याचा स्फोटक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केला. भाजपशी निगडित असलेल्या या कंपनीने कोरेगावचा विकास खुंटवला आहे, आणि कोणीच त्यांना हात घालण्याची हिंमत दाखवत नाही,असा थेट घणाघात त्यांनी शनिवारी सकाळी ल्हासुर्णे येथील निवासस्थानी शनिवारी सकाळी दहा वाजता केला.