मंगरूळपीर: न.प निवडणूक.🗳️
एमआयएमची कॉर्नर मिटिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद.
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले भाषण.
आज दिनांक २५ नॉव्हेंबर २०२५ मंगळवार रोजी मंगरूळपीर येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मजलीस इत्तेहादुल मुस्लिमीन एम.आय.एम पार्टीची कॉर्नर मिटिंग गाज़ी लॉन येथे ठेवण्यात आली होती.या मिटिंग मध्ये एम.आय.एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्येष्ठ नेते माजी खासदार श्री.इम्तियाज जलील यांनी प्रमुख वक्ते म्हणून संबोधित केले.तसेच एम.आय.एम पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसूफ पुंजाणी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल रफीक अब्दुल रहमान व इतर सर्व सदस्य उमेदवार उपस्थित होते.